मराठी नववर्षाचा गुढीपाडवा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तर नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव इथल्या वैभव खिल्लारे या तरुण शेतकऱ्याने अक्षरशः आपल्या कांद्याच्या शेतात गुढीला कांद्याची माळ, द्राक्ष, मिरच्यांच्या माळा घालत अनोखे संदेश फलक लावत गुढी उभारली आहे. कांद्याला हमीभाव द्या, पावसाने पीक झाले उद्ध्वस्त, शेतमालाला भाव द्या असे अनोखे फलक गुढीला लावत या शेतकऱ्याने आपल्या शेतात गुढी उभारत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
#Nashik #Yeola #GudiPadwa #GudhiPadwa #Farmers #OnionPrice #Rain #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #AbdulSattar #PikVima